शिक्षकांची कपात का बंद होती

Saturday 19 March 2016


DCPS धारकांनो वेळीच सावध व्हा.

👏👏कामशेट्टे परमेश्वर👏👏

👉👉राज्य शासनाने मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन म्हणजे जुनी पेन्शन हक्क संघटनेचा एक प्रकारे विजयच आहे .

🙏👏🙏संघटनने मृत कर्मचारी बांधवांबाबतीतील आपले "प्रथम" उत्तरदायित्व निभावले...!

✌✌मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मधील कुटुंबनिवृत्ती वेतन सरकारने देऊन त्यांनी DCPS मधील 1 त्रुटी दूर केली आहे .

🍭🍭पुढील काळात अशा प्रकारे DCPS मधील प्रत्येक त्रुटी दुर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे व ती आपल्यावर येनकेन प्रकारे लादणार आहे.

👎👎जसे जसे शासन यातील त्रुटी दूर करीत जाईल तसतसे शासनावरील आपला दबाव कमी होत जाईल.

💢⚡सध्या DCPS च्या कपातीचा घाट घालून सरकारने आपला वारू आपल्या मध्ये उधळून दिला आहे.

⚡⚡⚡त्यावर सध्या उपाय म्हणजे केवळ कोर्ट हाच आहे.

🚩🍭सरकार मागच्या 10 वर्षात DCPS योग्यरित्या कार्यान्वित करू शकले नाही हाच आपल्यासाठी कोर्टात सर्वात मोठा पुरावा आहे.

💢💢 21/8/2014 व 28/8/2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार DCPS हे NPS मध्ये परावर्तित होत आहे.

⚡☀⭐एकीकडे NPS मध्ये सामील झाल्याचे सांगत सरकार DCPS च्या कपती करू पाहत आहे.

🚩⚡मित्रांनो सरकार  DCPS ची अमलबजावणी योग्य प्रकारे करू शकले नाही या बाबतचे आपल्या हातातली पुरावे सरकार त्यातील त्रुटी दूर करण्याच्या प्रयत्नामुळे निघून जात आहेत.

🍭1) जसे कि मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कुठलाही लाभ न मिळणे .

🍭2)आपल्या DCPS च्या कपातीचा ताळमेळ नसणे.

🍭3)  सरकारचे 10% रक्कम जमा न होणे.

🍭4) जमा रकमेवर व्याज जमा न होणे.


🚩🚩 आनंदाची बाब हीच कि राज्यसरकारच्या अर्थसंकल्पात DCPS च्या तरतुदी बाबत मला तरी काही ऐकण्यात आले नाही.

👉🍭 आपल्याला कोर्टात DCPS विरोधात पुरावे मिळावेत यासाठीच

अर्थसंकल्पात DCPS

 साठी तरतूद करण्यात आली नाही असे आपण समजुया व कोर्टात लागणारे पुरावे जमा करूया.


☀☀एकप्रकारे मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन देऊन सरकार आपल्या आंदोलनातील हवा तर काढून घेत नाही ना असा प्रश्न जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे असे वाटणाऱ्या भोळ्याबाबड्या कर्मचार्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

🍭🍭विचार करा निर्णय घ्या व DCPS विरोधात वेळीच सावध व्हा नाहीतर वेळ निघून गेल्यास आपल्या हाताला काहीच लागणार नाही.

🙏🙏मी काही खूप मोठा DCPS चा तज्ञ नाही परंतु मला जे वाटते ते मी मांडण्याचा प्रयत्न केलाय.

👆👇🏾👉जर यात काही चूक असेल त्रुटी असेल तर निश्चित त्याची चर्चा झाली पाहिजे या मताचा मी आहे.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

      📝कामशेट्टे परमेश्वर
        📱9423356752
            प्रा.शा.भादली
            ता.घनसावंगी
            जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

Thursday 17 March 2016


काल निघालेल्या कपातीच्या पत्रा विरोधात
आपण सारेजण तीव्र विरोध करून कोर्टामध्ये गेल्यास स्थगिती मिळू शकते कारण इतके दिवस कशामुळे कपात बंद होती या बाबत कोर्ट शासनाला फटकरून काही वेगळा निर्णय देऊ शकते.

14 dec पासून पुलाखालून बरेच पाणी गेले आहे .या अडीच महिन्यात आपण  सर्व निष्क्रिय राहिल्या याचाच फायदा सरकारने उठवला आहे त्यामुळे आज शासनावर दाबावपेक्षा आपल्याला न्यायालयाच न्याय देऊ शकते.
   
    राज्य कार्यकारिणीने तात्काळ निधी जमा करण्यासाठी पावती बुक तयार केले पाहिजे जेणे करून न्यायालयात जाण्यासाठीच्या खर्च करता येईल.
  
  आपले मत काय?
  
       कामशेट्टे परमेश्वर
            जालना
       9423356752

पोलीस कर्मचाऱ्यांना नम्र विनंती👏👏👏

स.न.वि.वि.
पत्रास कारण कि-

साहेब 15 मार्चचे धरणे आंदोलन हे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतना संदर्भात आहे.

✌✌✌आम्हाला कल्पना आहे कि तुम्हाला संघटन ,मोर्चा, संप, आंदोलन कायद्याने करता येत नाही.

परंतु सरकारने DCPS/NPS बाबत पोलीस विभागासह सर्वच कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे .

🚩🚩🚩पोलीस विभागचा 14 डिसेंबर च्या हिवाळी अधिवेशयावरील मोर्चाला मनातून पाठिंबा होता व हे व्हायलाच पाहिजे असे आम्ही काही पोलीस कर्मचार्यांशी चर्चा केली असता त्यांनी या मोर्चाचे कौतुकच केले.

🍭🍭🍭मुंबईमध्ये साधारणतः 30000 ते 35000 हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना प्रत्यक्ष या धरणे आंदोलनात सहभागी होता येणार नाही

👉👉पण त्यांनी सरकारच्या या अन्यायाविरुद्ध होत असलेल्या लढ्याला पाठिंबा म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना जर या धरणे आंदोलनात सहभागी केले तर सरकारला DCPS/NPS चा विचारच करावा लागेल असे मला वाटते.

⚡⚡पेन्शन हा मुद्दा कर्मचाऱ्यांसाठी तसेच कुटुंबासाठी सुद्धा महत्वाचा आहे असे मला वाटते.⚡⚡

👬👬👬👬👬👬लोकशाही मध्ये डोकी मोजली जातात त्यामुळे जर पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या कुटुंबास या धरणे आंदोलनात सहभागी केले तर सर्व कर्मचाऱ्यांवर होणार हा अन्याय दूर होण्यास मदत होईल.

👬👬👬चला तर मग कुटुंबास धरणे आंदोलनात सहभागी करून या न्याय मागणीस बाळ द्या हि नम्र विनंती.

सर्व कर्मचाऱ्यांनी हि पोस्ट आपल्या पोलीस बांधवांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.

जेणे करून धरणे आंदोलनात संख्या वाढेल.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

        कामशेट्टे परमेश्वर
          9423356752
          ता.घनसावंगी
          जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

मित्रांनो आपल्या बोलणाऱ्या सहकारी बांधवांकडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी विषयी अपशब्द निघणार नाहीत याची दक्षता घ्या.
जसे कि आमदार खासदार यांना पेन्शन कशाला .?
असे वक्तव्य कोणीही करू नये असे मला वाटते.

हि बाब आपण सर्वांनी 17 मार्च पर्यंत टाळली पाहिजे.

नागपूर मोर्चाच्या वेळी आपल्या काही उत्साही बांधवांनी अपशब्द वापरल्या मुळेच आमदारांनी मोर्चाकडे पाठ फिरवली होती.

कामशेट्टे परमेश्वर
   जालना

DCPS धारकांनो सावधान पुढे धोका आहे.
वाचा  विचार करा आणि ठरवा

DCPS धारकांनो येत्या काही दिवसात राज्यातील संघटनांच्या अधिवेशनांचे पीक जोरात आले आहे व येईल.

संघटनेच्या अधिवेशनात
👉जुनी पेन्शन च्या मागणीचा
 मुद्दा क्रमांक 1 ☝ला घेण्यात येत असल्याचे  
👉तसेच महाराष्ट्र शासनाकडून 8 दिवसाच्या विशेष रजा मंजुर करण्यात आल्याचे सांगण्यात येईल व

👉अधिवेशनाच्या पावत्या फाडा आणि सुट्ट्यांच्या आनंद घ्या असे मोठेपणाने सांगतील.

🙏🙏🙏 परन्तु लक्षात घ्या बांधवांनो काल परवाच कुठल्यातरी नामांकित संघटनेचे अधिवेशन झाले आपल्याला सांगण्यात आले कि आता या अधिवेशनातील प्रमुख मागण्यामध्ये जुनी पेन्शन चा मुद्दा हा आम्ही

 क्रमांक 1☝ ला घेतलाय व आमचीच संघटना हा प्रश्न सोडवेल व या अधिवेशनात नक्कीच हा मुद्दा मंजूर करून घेऊ असे आपल्याला सांगितले गेले.

😒😒मग आपल्या DCPS धारक बांधवानी विचार केला व चर्चा सुरु केली पहा सर आपल्या नागपूर मोर्चामुळे जुनी पेन्शन च्या मागणीचा

 मुद्दा 1 ☝नंबर वर मोठ्या संघटनेने घेतलाय व आता काळजीचे कारण नाही चला तर मग आपण 500 रुपयांची पावती घेऊन सुट्ट्यांच्या आनंद घेऊ व आपली मागणी संघटना मान्य करून घेईलचकी आपण तेथे जाण्याची आवश्यकताच नाही.

👉अधिवेशनात मागण्या मांडण्यात आल्या त्यावर काय चर्चा झाली कुणालाच काही माहित नाही .कोणत्या मंजूर झाल्या काहीच माहित नाही.

☝अधिवेशन पार पडले आमचे बांधव सुट्टीचा आनंद उपभोगून आले .

👉 अधिवेशन संपन्न झाल्यानंतर
       सहाच दिवसात शासनाने अधिवेशनाचे गिफ्ट 💼💼दिले DCPS च्या दुहेरी कपातीचे शासनाने पत्र काढले.

सर्वच संघटनाचे पदाधिकारी थंडगार राहिले व आपल्या DCPS धारकांकडे अनुल्लेखाने व वेगळ्या नजरेने पाहत मनात म्हणू लागले कि मोर्चा काढता का आमच्या पेक्षा मोठी संघटना तयार करता का ?
कशी जिरली तुमची. आता काढा मोर्चे.

☝मग 11 तारखेपासून आपली तारांबळ उडायला लागली.जो तो आपल्या मित्रांना फोन करून
👉 DCPS कपातीचे पत्र खरे कि खोटे याची खात्री करून घेऊ लागला व म्हणू लागला कि आता जुनी पेन्शन ची आशा मवाळली.

😷😷परन्तु यावर कोणत्याही नावाजलेल्या  संघटनेने कुठलेही comment केली नाही फक्त बघ्याची भूमिका घेतली.

👉  आमची सर्वात मोठी संघटना आहे असे म्हणायचे व वेळ आल्यास दबा धरून बसायचा हा कोणता दुटप्पीपणा आहे.

✅✅✅
अधिवेशनाच्या पावत्या ह्या सर्वात जास्त Nov 2005 च्या शिक्षकांकडूनच फाडल्या जातात.

💵💵💵💵 साधारणपणे एका अधिवेशनात 60000 पावत्या फाडल्या
तर
  60000 × 500 रु =        
    30000000 रुपये इतक्या रकमेचे काय होते ते कुणालाच माहित नसते.

🙏🙏 मित्रांनो मला सर्वच संघटनांना दोष द्यायचा नाही काही संघटना ह्या सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या जाणिवेतून काम करतातच.

🙏🙏🙏विचार करा आपला प्रश्न आपणच सोडवण्यासाठी सिद्ध व्हा. दुसर्यांकडून अपेक्षा करू नका .

🙏मी काही खूप मोठा विचारवंत नाही कि तुम्हाला विचारांचा डोस पाजायला पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे.

   जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर 🙏🙏माफी असावी माझा तसा कुठलाही हेतू नाही.


       आपलाच DCPS
          त्रस्त सहकारी
         कामशेट्टे परमेश्वर
                जालना
           9423356752
💐💐
कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

Sunday 13 March 2016


👉कृपया POST कडे दुर्लक्ष करण्यापूर्वी वाचा आणि निर्णय घ्या.

DCPS धारक कर्मचारी बांधवांनो  
  🙏🙏🙏नमस्कार

मी काही संघटनेत नाही ,कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाही .

🙏माझी ही पोस्ट आपल्या राज्यभर विस्तारलेल्या शिक्षक बांधवांसाठी  ज्ञानाचा डोस नाही किंवा उपदेशही नाही.

पण कुठेतरी विचार केला पाहिजे.

 💢 1) दोनच दिवसा पूर्वी DCPS कपातीचे पत्र सर्व जिल्हापरिषदेला प्राप्त झाले आहे.

💢 2) मित्रांनो आपण सर्व कर्मचाऱ्यांनी DCPS ला विरोध व जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या आक्रोश मोर्चात 35 हजार कर्मचारी सहभागी  झाले होते.

💢 3) DCPS त्रस्त सर्व कर्मचारी या मोर्चात काही कारणास्तव
प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नसले तरी अप्रत्यक्ष म्हणजेच मनाने व धनाने सहभागी झाले होतेच कारण DCPS सारखी अन्याय करणारी योजना कोणालाही लागू होऊ नये असेच वाटते.

💢4) पण शासनाने आपल्यावर अन्याय करण्याचे ठरवले आहे.

💢5)  त्याचाच भाग म्हणून DCPS कपातीचे पत्र व त्या पत्राची अंमलबजावणी कर०यासाठीचे शेडयुल  सर्व EO ना आले आहे .

💢 6) पुन्हा एकदा नागपुर प्रमाणे धडक मोर्चा राज्यातील सर्व जिल्हा परिषद वर नेण्याची वेळ आली आहे .

💢 7) मित्रांनो राज्य स्तरावरून एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन झाले पाहिजे.

💢 8)मित्रांनो DCPS ला विरोध करण्याची व जुनी पेन्शन ची मागणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. यापुढील मोर्चात सर्वांनी तनाने ,मनाने व धनाने सहभागी होणे गरजेचे आहे.

💢9)2००5 नंतर लागलेले काही मित्र आज आमच्यात नाही आहे...ना त्यांना पेंशन आहे न अनुकंपा.त्यांचे कुटूंब आज उघड्यावर आहेत. शासनाने  अशा किती कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे का? साधी विचारपुस सुद्धा केली नाही.

💢 10) मी व माझ्या शिक्षक मित्रांनी विविध सहकारी बँकेचे, SBI, SBH, पतसंस्थेचे किमान 500000 लाख रुपये चे कर्ज उचललेले आहे. या कर्जापोटी द्यावा लागणारा 5 वर्षापर्यंतवर्षापर्यंतचा किमान 8500रू चा मासिक हप्ता भरावा लागेल.

💢11) बर DCPS चे 2   हफ्ते आपली आत्तापर्यंत  जितकी वर्षे सेवा झाली असेल म्हणजे किमान 5 वर्षे कपात होतील. निवृत्तीनंतर  मिळणार किती याबद्दल आपण सर्वजण साशंक आहोत.

💢12)  DCPS कपात व आपण घेतलेले कर्ज  बाबींचा विचार केल्यास आपल्या हातात नगदी किती मासिक वेतन पडेल याचा प्रत्यक्ष तुम्हीच हिशेब करा.
(आपण सर्वजण 3 वर्षांनंतर मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाचा हिशेब करतोच की ? )

💢 13) इतर संघटना वार्षिक अधिवेशाच्या नावाखाली
 केवळ आपली झोळी भरण्याचे काम करत आहेत.

💢14) 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी च्या अधिवेशनच्या पावत्या 2005 नंतरच्या शिक्षकांकडूनच जास्त फाडण्यात आल्या त्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो कि या अधिवेशनाचे हेच फलित आहे काय ?

💢15) आपला हक्क आपणच मिळवला पाहिजे इतर संघटनांवर अवलंबून न राहता सरकारशी दोन हात केले पाहिजे.


💢16) मित्रांनो वेळ गेली नाही विचार करा, इतरांना मोर्चात सहभागी होण्यासाठी विनंती करा, DCPS चे तोटे समजून सांगा व मोर्चाचे नियोजन करून एकाच वेळी शासनावर दबाव अणूयात व जुनी पेन्शचा आपला हक्क मिळूयात.

💢 17) मी एकटा मोर्चात नाही गेल्यास काही फरक पडणार नाही. असा विचार कूणीही करू नये.आपण लढ्यासाठी प्रत्येकजण अनमोल आहात.

💢18) यापुढच्या मोर्चात महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी मोर्चात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा व मोर्चातील संख्या वाढून सरकारवर दबाव पडेल.

💢19) DCPS कपातीचे फॉर्म भरून न देता आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊

✊अभि नही तो कभी नही ✊

💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी  पुढाकार घ्या .



३१ ऑक्टोबर २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचारी यांना  जुनी पेंशन योजना लागु करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या जिल्हास्तरावरच्या

    "ANTI DCPS "

च्या  मोर्चात सहभागी व्हा,ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

          परमेश्वर कामशेट्टे
          9423356752
           प्रा.शा.भादली
           जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.


🙏 वाचा व विचार करा🙏
     DCPS IMPORTANT

मित्रानो 15 फेब्रुवारी ला मा. महावीर माने सर यांना जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जे निवेदन देण्यात आले आहे ,त्या  वरून असे वाटते कि  सरकार ही योजना  कशा प्रकारे सुरळीत करू शकते , याबाबत सरकारला HINT च आहे असे मला वाटते.

20 मुद्यापैकी काही मुद्द्यावर माझा आक्षेप

💢मुद्दा क्रमांक 6

आत्ता पर्यंत शासनाने 10%  हिस्सा का जमा केला नाही?
👉👉या प्रश्नाचे उत्तर शासन नक्कीच काही दिवसात शोधून काढेल.


💢   मुद्दा क्रमांक 9

कपात झालेल्या रकमेची माहिती देण्याची जबाबदारी कोणाची असेल?
 👉👉👉नक्कीच काही दिवसात शासन एक जबाबदार अधिकारी नेमतील.

💢 मुद्दा क्रमांक 12
  कपातीच्याहिशोबाचे विवरण
    👉👉👉शासन यंत्रणा वापरून हिशोब देईल.

💢मुद्दा क्रमांक 13
   हा मुद्दा तर वाचत असताना आपण काय मागणी करतोय हेच न लक्षात येण्यासारखं आहे .
   👉👉 म्हणजेच DCPS योजनेचे फायदे काय आहेत हे सांगण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याची मागणी आहे?????

💪💪मित्रांनो आपणाला DCPS सुरळीत सुरु करायचय का जुनी पेन्शन लागू करून घ्यायचंय हे ठरवावं लागेल.


 😴😴😴मोठया आशेने राज्यभरातून 35000 हजाराच्या वर DCPS त्रस्त शिक्षक नागपूरच्या मोर्चात सहभागी झाले होते त्यांनी जुन्या पेन्शनची आणखीआशा सोडलेली नाही.

💵💵💵आजही शिक्षक रक्कम खर्च करण्यास तयार आहेत.

🙏🙏ते राज्य कार्यकारिणीकडे डोळे लावून बसलेले आहेत.

 👉👉या निवेदनातील मागण्या  DCPS सुरळीत  चालू  करण्याच्या  दिशेने दिसतात .आपल्याला  
👉DCPS बंदच करून ...जुनी पेंशन योजना
चालू  करायची   आहे ...

हे फक्त माझेच म्हणणे आहे असे नाही तर मी पाठवलेल्या निवेदनाच्या प्रतीवर अनेकांची हीच भावना आहे.......

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊

✊अभि नही तो कभी नही ✊

💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी  पुढाकार घ्या .


आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

          परमेश्वर कामशेट्टे
          9423356752
           प्रा.शा.भादली
           जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.