शिक्षकांची कपात का बंद होती

Saturday, 19 March 2016


DCPS धारकांनो वेळीच सावध व्हा.

👏👏कामशेट्टे परमेश्वर👏👏

👉👉राज्य शासनाने मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन म्हणजे जुनी पेन्शन हक्क संघटनेचा एक प्रकारे विजयच आहे .

🙏👏🙏संघटनने मृत कर्मचारी बांधवांबाबतीतील आपले "प्रथम" उत्तरदायित्व निभावले...!

✌✌मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मधील कुटुंबनिवृत्ती वेतन सरकारने देऊन त्यांनी DCPS मधील 1 त्रुटी दूर केली आहे .

🍭🍭पुढील काळात अशा प्रकारे DCPS मधील प्रत्येक त्रुटी दुर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे व ती आपल्यावर येनकेन प्रकारे लादणार आहे.

👎👎जसे जसे शासन यातील त्रुटी दूर करीत जाईल तसतसे शासनावरील आपला दबाव कमी होत जाईल.

💢⚡सध्या DCPS च्या कपातीचा घाट घालून सरकारने आपला वारू आपल्या मध्ये उधळून दिला आहे.

⚡⚡⚡त्यावर सध्या उपाय म्हणजे केवळ कोर्ट हाच आहे.

🚩🍭सरकार मागच्या 10 वर्षात DCPS योग्यरित्या कार्यान्वित करू शकले नाही हाच आपल्यासाठी कोर्टात सर्वात मोठा पुरावा आहे.

💢💢 21/8/2014 व 28/8/2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार DCPS हे NPS मध्ये परावर्तित होत आहे.

⚡☀⭐एकीकडे NPS मध्ये सामील झाल्याचे सांगत सरकार DCPS च्या कपती करू पाहत आहे.

🚩⚡मित्रांनो सरकार  DCPS ची अमलबजावणी योग्य प्रकारे करू शकले नाही या बाबतचे आपल्या हातातली पुरावे सरकार त्यातील त्रुटी दूर करण्याच्या प्रयत्नामुळे निघून जात आहेत.

🍭1) जसे कि मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कुठलाही लाभ न मिळणे .

🍭2)आपल्या DCPS च्या कपातीचा ताळमेळ नसणे.

🍭3)  सरकारचे 10% रक्कम जमा न होणे.

🍭4) जमा रकमेवर व्याज जमा न होणे.


🚩🚩 आनंदाची बाब हीच कि राज्यसरकारच्या अर्थसंकल्पात DCPS च्या तरतुदी बाबत मला तरी काही ऐकण्यात आले नाही.

👉🍭 आपल्याला कोर्टात DCPS विरोधात पुरावे मिळावेत यासाठीच

अर्थसंकल्पात DCPS

 साठी तरतूद करण्यात आली नाही असे आपण समजुया व कोर्टात लागणारे पुरावे जमा करूया.


☀☀एकप्रकारे मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन देऊन सरकार आपल्या आंदोलनातील हवा तर काढून घेत नाही ना असा प्रश्न जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे असे वाटणाऱ्या भोळ्याबाबड्या कर्मचार्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

🍭🍭विचार करा निर्णय घ्या व DCPS विरोधात वेळीच सावध व्हा नाहीतर वेळ निघून गेल्यास आपल्या हाताला काहीच लागणार नाही.

🙏🙏मी काही खूप मोठा DCPS चा तज्ञ नाही परंतु मला जे वाटते ते मी मांडण्याचा प्रयत्न केलाय.

👆👇🏾👉जर यात काही चूक असेल त्रुटी असेल तर निश्चित त्याची चर्चा झाली पाहिजे या मताचा मी आहे.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

      📝कामशेट्टे परमेश्वर
        📱9423356752
            प्रा.शा.भादली
            ता.घनसावंगी
            जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

Thursday, 17 March 2016


काल निघालेल्या कपातीच्या पत्रा विरोधात
आपण सारेजण तीव्र विरोध करून कोर्टामध्ये गेल्यास स्थगिती मिळू शकते कारण इतके दिवस कशामुळे कपात बंद होती या बाबत कोर्ट शासनाला फटकरून काही वेगळा निर्णय देऊ शकते.

14 dec पासून पुलाखालून बरेच पाणी गेले आहे .या अडीच महिन्यात आपण  सर्व निष्क्रिय राहिल्या याचाच फायदा सरकारने उठवला आहे त्यामुळे आज शासनावर दाबावपेक्षा आपल्याला न्यायालयाच न्याय देऊ शकते.
   
    राज्य कार्यकारिणीने तात्काळ निधी जमा करण्यासाठी पावती बुक तयार केले पाहिजे जेणे करून न्यायालयात जाण्यासाठीच्या खर्च करता येईल.
  
  आपले मत काय?
  
       कामशेट्टे परमेश्वर
            जालना
       9423356752

पोलीस कर्मचाऱ्यांना नम्र विनंती👏👏👏

स.न.वि.वि.
पत्रास कारण कि-

साहेब 15 मार्चचे धरणे आंदोलन हे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतना संदर्भात आहे.

✌✌✌आम्हाला कल्पना आहे कि तुम्हाला संघटन ,मोर्चा, संप, आंदोलन कायद्याने करता येत नाही.

परंतु सरकारने DCPS/NPS बाबत पोलीस विभागासह सर्वच कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे .

🚩🚩🚩पोलीस विभागचा 14 डिसेंबर च्या हिवाळी अधिवेशयावरील मोर्चाला मनातून पाठिंबा होता व हे व्हायलाच पाहिजे असे आम्ही काही पोलीस कर्मचार्यांशी चर्चा केली असता त्यांनी या मोर्चाचे कौतुकच केले.

🍭🍭🍭मुंबईमध्ये साधारणतः 30000 ते 35000 हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना प्रत्यक्ष या धरणे आंदोलनात सहभागी होता येणार नाही

👉👉पण त्यांनी सरकारच्या या अन्यायाविरुद्ध होत असलेल्या लढ्याला पाठिंबा म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना जर या धरणे आंदोलनात सहभागी केले तर सरकारला DCPS/NPS चा विचारच करावा लागेल असे मला वाटते.

⚡⚡पेन्शन हा मुद्दा कर्मचाऱ्यांसाठी तसेच कुटुंबासाठी सुद्धा महत्वाचा आहे असे मला वाटते.⚡⚡

👬👬👬👬👬👬लोकशाही मध्ये डोकी मोजली जातात त्यामुळे जर पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या कुटुंबास या धरणे आंदोलनात सहभागी केले तर सर्व कर्मचाऱ्यांवर होणार हा अन्याय दूर होण्यास मदत होईल.

👬👬👬चला तर मग कुटुंबास धरणे आंदोलनात सहभागी करून या न्याय मागणीस बाळ द्या हि नम्र विनंती.

सर्व कर्मचाऱ्यांनी हि पोस्ट आपल्या पोलीस बांधवांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.

जेणे करून धरणे आंदोलनात संख्या वाढेल.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

        कामशेट्टे परमेश्वर
          9423356752
          ता.घनसावंगी
          जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

मित्रांनो आपल्या बोलणाऱ्या सहकारी बांधवांकडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी विषयी अपशब्द निघणार नाहीत याची दक्षता घ्या.
जसे कि आमदार खासदार यांना पेन्शन कशाला .?
असे वक्तव्य कोणीही करू नये असे मला वाटते.

हि बाब आपण सर्वांनी 17 मार्च पर्यंत टाळली पाहिजे.

नागपूर मोर्चाच्या वेळी आपल्या काही उत्साही बांधवांनी अपशब्द वापरल्या मुळेच आमदारांनी मोर्चाकडे पाठ फिरवली होती.

कामशेट्टे परमेश्वर
   जालना

DCPS धारकांनो सावधान पुढे धोका आहे.
वाचा  विचार करा आणि ठरवा

DCPS धारकांनो येत्या काही दिवसात राज्यातील संघटनांच्या अधिवेशनांचे पीक जोरात आले आहे व येईल.

संघटनेच्या अधिवेशनात
👉जुनी पेन्शन च्या मागणीचा
 मुद्दा क्रमांक 1 ☝ला घेण्यात येत असल्याचे  
👉तसेच महाराष्ट्र शासनाकडून 8 दिवसाच्या विशेष रजा मंजुर करण्यात आल्याचे सांगण्यात येईल व

👉अधिवेशनाच्या पावत्या फाडा आणि सुट्ट्यांच्या आनंद घ्या असे मोठेपणाने सांगतील.

🙏🙏🙏 परन्तु लक्षात घ्या बांधवांनो काल परवाच कुठल्यातरी नामांकित संघटनेचे अधिवेशन झाले आपल्याला सांगण्यात आले कि आता या अधिवेशनातील प्रमुख मागण्यामध्ये जुनी पेन्शन चा मुद्दा हा आम्ही

 क्रमांक 1☝ ला घेतलाय व आमचीच संघटना हा प्रश्न सोडवेल व या अधिवेशनात नक्कीच हा मुद्दा मंजूर करून घेऊ असे आपल्याला सांगितले गेले.

😒😒मग आपल्या DCPS धारक बांधवानी विचार केला व चर्चा सुरु केली पहा सर आपल्या नागपूर मोर्चामुळे जुनी पेन्शन च्या मागणीचा

 मुद्दा 1 ☝नंबर वर मोठ्या संघटनेने घेतलाय व आता काळजीचे कारण नाही चला तर मग आपण 500 रुपयांची पावती घेऊन सुट्ट्यांच्या आनंद घेऊ व आपली मागणी संघटना मान्य करून घेईलचकी आपण तेथे जाण्याची आवश्यकताच नाही.

👉अधिवेशनात मागण्या मांडण्यात आल्या त्यावर काय चर्चा झाली कुणालाच काही माहित नाही .कोणत्या मंजूर झाल्या काहीच माहित नाही.

☝अधिवेशन पार पडले आमचे बांधव सुट्टीचा आनंद उपभोगून आले .

👉 अधिवेशन संपन्न झाल्यानंतर
       सहाच दिवसात शासनाने अधिवेशनाचे गिफ्ट 💼💼दिले DCPS च्या दुहेरी कपातीचे शासनाने पत्र काढले.

सर्वच संघटनाचे पदाधिकारी थंडगार राहिले व आपल्या DCPS धारकांकडे अनुल्लेखाने व वेगळ्या नजरेने पाहत मनात म्हणू लागले कि मोर्चा काढता का आमच्या पेक्षा मोठी संघटना तयार करता का ?
कशी जिरली तुमची. आता काढा मोर्चे.

☝मग 11 तारखेपासून आपली तारांबळ उडायला लागली.जो तो आपल्या मित्रांना फोन करून
👉 DCPS कपातीचे पत्र खरे कि खोटे याची खात्री करून घेऊ लागला व म्हणू लागला कि आता जुनी पेन्शन ची आशा मवाळली.

😷😷परन्तु यावर कोणत्याही नावाजलेल्या  संघटनेने कुठलेही comment केली नाही फक्त बघ्याची भूमिका घेतली.

👉  आमची सर्वात मोठी संघटना आहे असे म्हणायचे व वेळ आल्यास दबा धरून बसायचा हा कोणता दुटप्पीपणा आहे.

✅✅✅
अधिवेशनाच्या पावत्या ह्या सर्वात जास्त Nov 2005 च्या शिक्षकांकडूनच फाडल्या जातात.

💵💵💵💵 साधारणपणे एका अधिवेशनात 60000 पावत्या फाडल्या
तर
  60000 × 500 रु =        
    30000000 रुपये इतक्या रकमेचे काय होते ते कुणालाच माहित नसते.

🙏🙏 मित्रांनो मला सर्वच संघटनांना दोष द्यायचा नाही काही संघटना ह्या सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या जाणिवेतून काम करतातच.

🙏🙏🙏विचार करा आपला प्रश्न आपणच सोडवण्यासाठी सिद्ध व्हा. दुसर्यांकडून अपेक्षा करू नका .

🙏मी काही खूप मोठा विचारवंत नाही कि तुम्हाला विचारांचा डोस पाजायला पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे.

   जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर 🙏🙏माफी असावी माझा तसा कुठलाही हेतू नाही.


       आपलाच DCPS
          त्रस्त सहकारी
         कामशेट्टे परमेश्वर
                जालना
           9423356752
💐💐
कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

Sunday, 13 March 2016


👉कृपया POST कडे दुर्लक्ष करण्यापूर्वी वाचा आणि निर्णय घ्या.

DCPS धारक कर्मचारी बांधवांनो  
  🙏🙏🙏नमस्कार

मी काही संघटनेत नाही ,कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाही .

🙏माझी ही पोस्ट आपल्या राज्यभर विस्तारलेल्या शिक्षक बांधवांसाठी  ज्ञानाचा डोस नाही किंवा उपदेशही नाही.

पण कुठेतरी विचार केला पाहिजे.

 💢 1) दोनच दिवसा पूर्वी DCPS कपातीचे पत्र सर्व जिल्हापरिषदेला प्राप्त झाले आहे.

💢 2) मित्रांनो आपण सर्व कर्मचाऱ्यांनी DCPS ला विरोध व जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या आक्रोश मोर्चात 35 हजार कर्मचारी सहभागी  झाले होते.

💢 3) DCPS त्रस्त सर्व कर्मचारी या मोर्चात काही कारणास्तव
प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नसले तरी अप्रत्यक्ष म्हणजेच मनाने व धनाने सहभागी झाले होतेच कारण DCPS सारखी अन्याय करणारी योजना कोणालाही लागू होऊ नये असेच वाटते.

💢4) पण शासनाने आपल्यावर अन्याय करण्याचे ठरवले आहे.

💢5)  त्याचाच भाग म्हणून DCPS कपातीचे पत्र व त्या पत्राची अंमलबजावणी कर०यासाठीचे शेडयुल  सर्व EO ना आले आहे .

💢 6) पुन्हा एकदा नागपुर प्रमाणे धडक मोर्चा राज्यातील सर्व जिल्हा परिषद वर नेण्याची वेळ आली आहे .

💢 7) मित्रांनो राज्य स्तरावरून एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन झाले पाहिजे.

💢 8)मित्रांनो DCPS ला विरोध करण्याची व जुनी पेन्शन ची मागणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. यापुढील मोर्चात सर्वांनी तनाने ,मनाने व धनाने सहभागी होणे गरजेचे आहे.

💢9)2००5 नंतर लागलेले काही मित्र आज आमच्यात नाही आहे...ना त्यांना पेंशन आहे न अनुकंपा.त्यांचे कुटूंब आज उघड्यावर आहेत. शासनाने  अशा किती कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे का? साधी विचारपुस सुद्धा केली नाही.

💢 10) मी व माझ्या शिक्षक मित्रांनी विविध सहकारी बँकेचे, SBI, SBH, पतसंस्थेचे किमान 500000 लाख रुपये चे कर्ज उचललेले आहे. या कर्जापोटी द्यावा लागणारा 5 वर्षापर्यंतवर्षापर्यंतचा किमान 8500रू चा मासिक हप्ता भरावा लागेल.

💢11) बर DCPS चे 2   हफ्ते आपली आत्तापर्यंत  जितकी वर्षे सेवा झाली असेल म्हणजे किमान 5 वर्षे कपात होतील. निवृत्तीनंतर  मिळणार किती याबद्दल आपण सर्वजण साशंक आहोत.

💢12)  DCPS कपात व आपण घेतलेले कर्ज  बाबींचा विचार केल्यास आपल्या हातात नगदी किती मासिक वेतन पडेल याचा प्रत्यक्ष तुम्हीच हिशेब करा.
(आपण सर्वजण 3 वर्षांनंतर मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाचा हिशेब करतोच की ? )

💢 13) इतर संघटना वार्षिक अधिवेशाच्या नावाखाली
 केवळ आपली झोळी भरण्याचे काम करत आहेत.

💢14) 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी च्या अधिवेशनच्या पावत्या 2005 नंतरच्या शिक्षकांकडूनच जास्त फाडण्यात आल्या त्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो कि या अधिवेशनाचे हेच फलित आहे काय ?

💢15) आपला हक्क आपणच मिळवला पाहिजे इतर संघटनांवर अवलंबून न राहता सरकारशी दोन हात केले पाहिजे.


💢16) मित्रांनो वेळ गेली नाही विचार करा, इतरांना मोर्चात सहभागी होण्यासाठी विनंती करा, DCPS चे तोटे समजून सांगा व मोर्चाचे नियोजन करून एकाच वेळी शासनावर दबाव अणूयात व जुनी पेन्शचा आपला हक्क मिळूयात.

💢 17) मी एकटा मोर्चात नाही गेल्यास काही फरक पडणार नाही. असा विचार कूणीही करू नये.आपण लढ्यासाठी प्रत्येकजण अनमोल आहात.

💢18) यापुढच्या मोर्चात महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी मोर्चात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा व मोर्चातील संख्या वाढून सरकारवर दबाव पडेल.

💢19) DCPS कपातीचे फॉर्म भरून न देता आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊

✊अभि नही तो कभी नही ✊

💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी  पुढाकार घ्या .



३१ ऑक्टोबर २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचारी यांना  जुनी पेंशन योजना लागु करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या जिल्हास्तरावरच्या

    "ANTI DCPS "

च्या  मोर्चात सहभागी व्हा,ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

          परमेश्वर कामशेट्टे
          9423356752
           प्रा.शा.भादली
           जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.


🙏 वाचा व विचार करा🙏
     DCPS IMPORTANT

मित्रानो 15 फेब्रुवारी ला मा. महावीर माने सर यांना जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जे निवेदन देण्यात आले आहे ,त्या  वरून असे वाटते कि  सरकार ही योजना  कशा प्रकारे सुरळीत करू शकते , याबाबत सरकारला HINT च आहे असे मला वाटते.

20 मुद्यापैकी काही मुद्द्यावर माझा आक्षेप

💢मुद्दा क्रमांक 6

आत्ता पर्यंत शासनाने 10%  हिस्सा का जमा केला नाही?
👉👉या प्रश्नाचे उत्तर शासन नक्कीच काही दिवसात शोधून काढेल.


💢   मुद्दा क्रमांक 9

कपात झालेल्या रकमेची माहिती देण्याची जबाबदारी कोणाची असेल?
 👉👉👉नक्कीच काही दिवसात शासन एक जबाबदार अधिकारी नेमतील.

💢 मुद्दा क्रमांक 12
  कपातीच्याहिशोबाचे विवरण
    👉👉👉शासन यंत्रणा वापरून हिशोब देईल.

💢मुद्दा क्रमांक 13
   हा मुद्दा तर वाचत असताना आपण काय मागणी करतोय हेच न लक्षात येण्यासारखं आहे .
   👉👉 म्हणजेच DCPS योजनेचे फायदे काय आहेत हे सांगण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याची मागणी आहे?????

💪💪मित्रांनो आपणाला DCPS सुरळीत सुरु करायचय का जुनी पेन्शन लागू करून घ्यायचंय हे ठरवावं लागेल.


 😴😴😴मोठया आशेने राज्यभरातून 35000 हजाराच्या वर DCPS त्रस्त शिक्षक नागपूरच्या मोर्चात सहभागी झाले होते त्यांनी जुन्या पेन्शनची आणखीआशा सोडलेली नाही.

💵💵💵आजही शिक्षक रक्कम खर्च करण्यास तयार आहेत.

🙏🙏ते राज्य कार्यकारिणीकडे डोळे लावून बसलेले आहेत.

 👉👉या निवेदनातील मागण्या  DCPS सुरळीत  चालू  करण्याच्या  दिशेने दिसतात .आपल्याला  
👉DCPS बंदच करून ...जुनी पेंशन योजना
चालू  करायची   आहे ...

हे फक्त माझेच म्हणणे आहे असे नाही तर मी पाठवलेल्या निवेदनाच्या प्रतीवर अनेकांची हीच भावना आहे.......

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊

✊अभि नही तो कभी नही ✊

💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी  पुढाकार घ्या .


आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

          परमेश्वर कामशेट्टे
          9423356752
           प्रा.शा.भादली
           जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

आमचे मित्र श्री ओमकार सोनटक्के सर(7588875533) यांनी आजच्या दैनिक एकमत वर्तमान पत्रामध्ये जुनी पेन्शन का हवी आहे व 15 मार्चच्या मुंबई येथील धरणे आंदोलनाविषयीची बातमी दिली आहे.
अशा प्रकारच्या बातम्यांमुळे सरकार व जनता यांच्यामध्ये जाणीव जागृती होईल.
सोनटक्के सरांचे आभार
एकच मिशन जूनी पेन्शन
JUST CLICK THIS LINK PLZ TO SEE NEWS
http://dainikekmat.com/Latur-9024-56e4c2e72472d-13.html


DCPS त्रस्त कर्मचारी बांधवांनो नमस्कार👏👏👏

कृपया वाचा व DCPS चा अभ्यास करा.

     📝 कामशेट्टे परमेश्वर
       📱 9423356752
              जालना

 👉  माझे जे सहकारी बांधव 15 मार्चच्या मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत त्यांचे अभिनंदन✋ ।

  👉👇🏾👉मित्रांनो कुठलाही अन्याय हा सहन करायचा नसतो आणि राज्य सरकारने शिक्षकांवर जुनी पेन्शन न लागू करता व न्यायालयाचा अवमान करून DCPS ची नियमबाह्य कपात करण्यासाठी कंबर कसल्याच दिसत आहे.

💢⚡सरकार आपल्यावर अन्याय करत आहे हे मी माझ्या मागील पोस्ट मध्ये सविस्तर व पुराव्या आधारे स्पष्ट केले आहे ज्या ज्या माझ्या कर्मचारी बांधवांनी त्या पोस्टचे सूक्ष्म व बारकाईने वाचन केले आहे त्यांना माझे म्हणणे पटलेले आहे.

⚡⚡ज्यांनी त्या पोस्टचे सूक्ष्मपणे वाचन केले नाही त्यांच्यासाठी मी येथे

 लिंक देतोय

https://m.facebook.com/story.php?story_fbid=905705332861577&id=100002663568144

कृपया वाचा व DCPS बाबत सूक्ष्म अभ्यास करावा व मी मांडलेला युक्तिवाद

खरा कि आणखी त्यात काही वेगळे आहे

याचा आपण अभ्यास करूया बांधवांनो DCPS विरोधात डोळसपणे लढणे गरजेचे आहे असे मला वाटते.

 👍💢⚡ बांधवांनो 15 मार्च रोजी जुनी पेन्शन च्या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजन जुनी पेन्शन हक्क संघटनेने केले आहे.

👉👆👇🏾मित्रांनो जे कर्मचारी 15 मार्चला त्या धरणे आंदोलनात काही कारणास्तव सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांनी

⚡⚡15 मार्चच्या दिवशी एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन ⚡⚡

करून आपली मागणी ही रास्त आहे हे सरकारला ठासून सांगतां येईल व त्या धरणे आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठबळच  मिळेल असे मला वाटते.


 👏👏🙏🙏ज्या वरिष्ठ संघटना या धरणे आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र देत आहेत व ज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत त्यांचे स्वागतच💐💐💐💐💐

✊👍👉परन्तु ज्या वरिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष धरणे आंदोलनात काही कारणास्तव सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांनी सुद्धा 15 मार्चच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन करावे अशी माझी नम्र विंनती आहे जर असे झाले तरच त्यांच्या पाठिंब्याच्या पत्राला किंमत येईल अथवा फक्त आमचे समाधान केले असे होऊ नये.

🍭⚡अश्या प्रकारचे नियोजन जर राज्यस्तरावरून झाल्यास व त्याला MEDIA मध्ये प्रसिद्धी दिल्यास सरकारला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल.

⚡🍭वाचा व यावर विचार कर.
⚡🍭

👉✌✊✅ एक दिवस रजा घेतल्याने कुठलाही खर्च होणार नाही व आपले बळ जुनी पेन्शन च्या मागणीसाठी होत असलेल्या धरणे आंदोलनाला मिळेल.

👉याबाबत आजच चर्चा झाल्यास राज्य व जिल्हास्तरावरून हि बाब राबवत येईल.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

      📝कामशेट्टे परमेश्वर
        📱9423356752
            प्रा.शा.भादली
            ता.घनसावंगी
            जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

Saturday, 12 March 2016


DCPS धारकांनो वेळ काढून वाचाच. थोडा तरी विचार करा.
   DCPS     DCPS    DCPS

 👉👉2014 मध्ये निवडणूक होत असताना सर्व कर्मचारी , शेतकरी तसेच जनता यांना एक आशेचा किरण दिसला व नवीन येणारे सरकार हे मोठ्या फरकाने  सत्तेवर आरूढ झाले .

😜😜😜😜सर्व जनता ,कर्मचारी ,शेतकरी हे या सरकार कडे डोळे लावून चांगल्या निर्णयाची वाट पाहत असतानाच दररोज एक नवीन तुघलकी निर्णय काढत आहे व दोनच दिवसात त्यावर टीका झाल्यास तो मागे घेत आहे.
 
  👉👉मग तो 8 तास शाळा सुरु ठेवण्याचा असो कि सहलीवर निर्बंध घालण्याचा असो कि चारा छावण्या ऑगस्ट ते जानेवारी पर्यंत चालू ठेऊन अचानक सरकारला मे पर्यंत पाणी पुरेल असे वाटण्याचा साक्षात्कार होऊन छावण्या बंद करण्याचा असो ह्या सरकारच्या तुघलकी निर्णयाने जनता त्रस्त झाली आहे.


 💢💢👉👉👉स्व. नकाशे सर सारख्या प्रामाणिक मुख्याध्यापकावर ची कारवाई झाली व त्यांनी आपले जीवन संपवले.

💢💢👉👉👉कर्मचारी बांधवांनो आपल्याला पेन्शन न देता व  DCPS सारखी तुघलकी योजना मागच्या सरकारने आपल्यावर लादली.

💢👎👎👎👎ह्या योजनेची कशाप्रकारे अंमलबजावणी करावी हे मागच्या सरकारला पण शेवट पर्यंत समजले नव्हते.


😫😫😫😫 जुन्या सरकारने DCPS सारखी जाचक योजना सुरु करून पाप केले आहे आणि हे पाप या सरकारने आपल्या पदरात घेण्याचे पक्के ठरवले आहे असेच वाटते.

👎👎 परंतु हे सरकार हे  पाप पदरात घेत असताना आमच्या सरकारने खूप मोठी कामगिरी करत असल्याचा अविर्भाव जर आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांच्यासाठीच धोक्याची घंटा ठरेल.

👉👉👉👉काल ,आज व येत्या दोन तीन दिवसात सर्व DCPS धारक कर्मचारी यांचे ACCOUNT NU. तात्काळ माहिती तालुका स्तरावर मागण्यात आले आहेत.

💢👎👎 DCPS चे तोटे माहिती असून सुद्धा आपले कर्मचारी त्याला विरोध करताना दिसत नाहीत व साधी चर्चाही करीत नाहीत.

🙏🙏🙏 सहकारी मित्रानो जर का एकदा ह्या कपाती सुरु झाल्या तर आपल्याला आपला हिशोब तर मिळणारच व एक तुघलकी योजनेचं भूत आयुष्यभर आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार  नाही, यात  आपला पाय खोलात रुतेल व नंतर
               FEEL
 होऊन त्याचा काही👎👎 उपयोग होणार नाही.
   कारण याला विरोध एकत्रितपणे तीव्र म्हणजेच  तन ,मन ,व धनाने  करण्याची गरज आहे.

👉👉 मित्रानो संधी हि एकदाच मिळते. ती आपल्याला मिळालीय , त्याच रूपांतर हे आपण सर्वजण एकत्रित येऊन ह्या भुताला सर्वांनी मिळून उचलून आपटायचय.

 🙏🙏🙏मी काही तुम्हाला ज्ञानाचे डोस पाजवण्याइतका ज्ञानी नाही. तुम्ही सर्व सुज्ञ आहेत . पण सर्वजण एकत्र येऊन ह्या कपातिला विरोध करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

👉✊✊✊जर आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला तर सरकार ज्या प्रमाणे आज घेतलेला निर्णय तिसऱ्या दिवशी विरोधक व जनता यांच्या दबावामुळे रद्द करतेय त्याच प्रमाणे आपल्या कपात बंदीचा निर्णय घेईल व जुन्या पेन्शन बाबत गांभीर्याने विचार करेल.

💪💪 करा विचार आणि आजच संकल्प करा कि आम्ही आमची DCPS ची कपात करणार नाही.

💪💪जुन्या पेन्शन हक्क संघटनेला शासनावर दबाव आणण्यासाठी बाळ द्या.


✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊

✊अभि नही तो कभी नही ✊

💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी  पुढाकार घ्या .

 
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

          परमेश्वर कामशेट्टे
          9423356752
           प्रा.शा.भादली
           जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.


👏👏DCPS ची कपात तात्काळ थांबविने या विषयी माझे मत👏
        कामशेट्टे परमेश्वर
                  जालना

  💢  आज आपण DCPS ला  कितीही विरोध केला बहिष्कार टाकला तरी आपल्याला कपती ह्या कराव्याच लागणार आहेत.

 👉मित्रांनो आपली लढाई ही निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.

👉👉आता आपल्याला कोर्टाच धाव घ्यायला हवी आहे.

☝सर्वांनाच असे वाटतेय कि राज्यातून कोणीतरी याचिका दाखल करेल व stay येईल.

👎मित्रांनो आपण सर्वजण परावलंबी बनत चाललो आहेत असे वाटत नाही का.?

👉होय मला तसेच बऱ्याच मित्रांना असे वाटतेय कि आपण दाखल करावी याचिका   पण त्यापेक्षा जर जिल्हा कार्यकारिणीने पुढाकार घेतल्यास त्याला योग्य स्वरूप येईल.

💢कोर्टात कशाप्रकारे जाता  येईल?💢💢

👉 कोर्टात जाण्यासाठी 100 शिक्षकांचा ग्रुप असणे आवश्यक आहे.

👉त्यासाठी खर्च हा आलाच व होणारच व झालाच पाहिजे त्यात दुमत नाही.

👉 आज प्रत्येक जिल्ह्यातून DCPS कपती विरोधात संबधीत HIGH कोर्टात

 वेगवेगळ्या वकीलामार्फत

स्टे साठी दावा देणे आवश्यक आहे
कारण सर्व वकिलांची
दबाव हा HIGH COURT वर येईल
व DCPS च्या कपतीला तात्काळ स्थगिती मिळेल व आपली बाजू आपण मांडू शकु.

✅✅मित्रांनो ज्या दिवशी STAY मिळेल त्या दिवशी आपण 50%  लढाई जिंकणार आहोत.

कारण खूप बाबी ह्या आपल्या बाजूने आहेत.
 
💢आता आपण 100  शिक्षक कसे होतील हे पाहू.💢

👍 प्रत्येक जिल्ह्यातील जुनी पेन्शन हक्क संघटन चे तालुका व त्यांच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या संख्येची
 बेरीज करू हि संख्या 75 ते 80 च्या आसपास जाईल.

व ते सर्वजण खर्च करण्यास तयार असतीलच कारण

 पदाधिकार्यांशीवाय DCPS चे जास्त तोटे दुसऱ्या कोनालाहि समजू शकणारे नाहीत असे मला वाटते .

✅✅100 पैकी 80 जणांची  खर्च जो काही  प्रत्येकी 2000 रुपये किंवा त्या पेक्षा जास्त जास्त खर्चाची तयारी झाली आता 20 जणांची काळजी करण्याचे कारण नाही

आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी येईल तो खर्च 2000 रुपये किंवा त्या पेक्षा जास्त देण्यासाठी  ज्यांना

खरेच वाटतेय कि जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे

असे वाटतेय पण कोणत्याही पदावर नाहीत .

✅✅एकदा आपण स्टे आणला कि मग धरणे निवेदन मोर्चा या अस्त्र यांचा वापर करून DCPS  च्या तोटे आपण समजून सांगून कोर्टाला  व शासनाला  जुनी पेन्शन लागू करण्यास भाग पाडू असे मला वाटते.

👏👏पहा मित्रानो विचार करा निर्णय घ्या वेळ गेली नाही.🙏🙏


हा संदेश पुढे पाठवा.
प्रतिक्रिया द्या .
मनाचा निश्चय करा.

     🙏  🙏 कळावे🙏🙏
       आपलाच सहकारी
     
       कामशेट्टे परमेश्वर
     घनसावंगी जि. जालना
        9423356752


शिक्षक बांधवांनो आपली DCPS कपात का बंद होती???????????
      📌📌वाचा📌📌
           कामशेट्टे परमेश्वर
        घनसावंगी जी जालना
            9423356752

👇🏾👇🏾
26 फेब्रुवारी 2016 रोजी DCPS च्या कपाती करण्यासंदर्भात शालार्थ चा TAB OPEN करत असल्याबाबतचे पत्राचे सूक्ष्म व संदर्भाने वाचन केले असता असे लक्षात आले कि


📌📌मित्रांनो आपल्या DCPS च्या कपती ह्या पुढील पत्राने स्थगित झाली होती.

👇🏾👇🏾👇🏾
क्र. शिसमा/आस्था-ब/121/शालार्थ/2014/3893,
दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्र
👆👆👆


या पत्राने आपल्या DCPS च्या कपाती एप्रिल 2014 पासून बंद झाल्या होत्या.

👉त्या पत्राचा खुलासा करण्यासाठी या योजनेला मुंबई HIGH COURT मध्ये केवळ याचिका दाखल करण्यात आल्यामुळे शिक्षक संचालनाने पत्र काढून तात्पुरती कपात थांबविण्यात आले होते असे स्पष्ट केले आहे.

त्यावर माझे काही प्रश्न

 👉1)कोर्टातील त्या याचिकेचा निकाल लागलाय का?

२) जर कोर्टातील त्या याचिकेचा निकाल लागला नसेल तर DCPS  च्या कपातीसाठी एवढी घाई का?

3)जर निकाल लागला असेल तर काय लागला व कोर्टाचे म्हणणे काय आहे?


4)इतके दिवस कपात बंद ठेऊन सरकारने काय सध्या केले?

5) एकवेळ असे मान्य केले कि DCPS हि योजना चांगली आहे तर मग या कपती 8 वर्ष बंद राहील्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण?

👇🏾👇🏾👇🏾निष्कर्ष👇🏾👇🏾👇🏾

कपती बंद राहिल्यामुळे आमचे नुकसान झाले कारणाने आम्हाला जुनी पेन्शनच लागू झाली पाहिजे हे आपण वकीलामार्फत कोर्टात सांगू शकतो व आपली मागणी पूर्ण करू शकतो.

        💢माझेमत💢

यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून संबंधीत
📌 HIGH COURT 📌
मध्ये DCPS कपती विरोधात आता STAY आणणे गरजेचे आहे.

दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्र
 जर आपल्याला उपलब्ध झाले तर तो कोर्टामध्ये DCPS च्या तसेच सरकारच्या विरोधात त्यांनी केलेल्या अन्यायाबाबत महत्वाचा पुरावा होऊ शकतो असे मला वाटते.

DCPS कपाती बाबत कोर्टाचा STAY म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्यासारखे आहे.

   📌📌नम्र विनंती📌📌

 दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्र

👆👆👉👊जर कोणाकडे उपलब्ध असेल तर WHATS UP वर सादर करून जे बांधव कोर्टात याचिका दाखल करत आहेत त्यांना मदत करावी.

  📌अत्यंत महत्वाचे📌

जे शिक्षक बांधव मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनी DCPS बाबतच्या ज्या याचिकेमुळे आपला STAY आलेला होता ती याचिका कोणी दाखल केली होती त्याचा
शोध घेऊन निर्णय  लागला आहे कि नाही हे पाहणे गरजेचे आहे.

✊जर लागला असेल तर कोर्टाने काय निकाल दिलाय तो अभ्यासणे गरजेचे आहे.

संबंधित याचिका हि कोणत्या वकीलामार्फत दाखल केली होती? हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे.

👉या सर्व बाबी आपणाला जुनी पेन्शन मिळवून देण्यास मदत करणार आहेत.

आजही आमच्या बऱ्याच कर्मचारी बांधवांना माझ्यासह हे माहित नव्हते कि DCPS कपात का बंद होती.

👉 खरोखरच तो STAY आपलाच होता कि 1 नोव्हेंबर 2005 च्या कर्मचाऱ्यांचा होता हेच आम्हाला माहित नव्हते.

📌 असो काही का कारण असेना DCPS च्या कपती बंद होत्या हे आपणाला

      👊जुनी पेन्शन👊

 मिळवून देण्यासाठीच सरकारने केलेली चूक आहे असे आपणाला म्हणता येईल.

चलो मुंबई 🏃चलो मुंबई 🏃चलो मुंबई

👉✊👊15 मार्चला आजाद मैदान ,मुंबई येथे
"महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन"

 ने ठेवलेल्या मुंबई येथील धरणे आंदोलनात सर्वांनी सहभागी होऊन व सरकारवर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दबाव आणूया व कोर्टात पण लढूया.
आपला हक्क मिळवण्यासाठी सज्ज व्हा.

🙏🙏एक नम्र विनंती🙏🙏

हा संदेश राज्याच्या सर्व कर्मचार्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे कारण त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल कि जुनी पेन्शन आम्हाला नक्कीच मिळेल.
कारण कोर्टामध्ये आपली बाजू हि भक्कम आहे.

आपल्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय.
हा विचार पुढे पाठवा.

   जुनी पेन्शनचा एक शिलेदार
         📝 कामशेट्टे परमेश्वर
        घनसावंगी जि.जालना
             9423356752

अन्यायग्रस्त DCPS धारकांनो

📢📢चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई

वेळ काढून वाचाच👏👏

विदर्भातील गडचिरोली, भंडारा,गोंदिया चंद्रपूरसह सर्व जिल्ह्यातील कर्मचारी बांधवांनी जुनी पेन्शनच्या मागणीचे
           🌿रोपटे 🌿
 लावले त्या रोपट्याला आपण सर्वांनी वाढीचा आधार दिला पाहिजे.

⚡⚡सहकारी बांधवांनो नागपूरचा मोर्चा हा विदर्भातील आपल्या बांधवानी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहून यशस्वी केला.

त्याबद्दल त्यांचे आपण आभारी 🙏🙏🙏आहोत असे मी म्हणणार नाही .
कारण हि लढाई केवळ त्यांचीच नाही तर माझी (आमची )सुद्धा आहे.

🍭🍭🍭आता वेळ आहे ती कोकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या विभागातील अन्यायग्रस्त व DCPS त्रस्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने
मुंबईच्या 15 मार्च रोजी होणाऱ्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जुनी पेन्शनच्या मागणीला मूर्त स्वरूप देणे आवश्यक आहे.

📢📢📢📢मित्रांनो नागपूरच्या मोर्चाच्या दिवशी त्या विभागातील काही जिल्ह्यातील जसे नागपूर ,गडचिरोली,चंद्रपूर यासह अनेक जिल्ह्यातील शाळा ह्या पूर्णतः बंद होत्या म्हणजेच ओस पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती व मोठ्या प्रमाणावर आपले सहकारी मोर्चात सामील झाले होते.

🎈🎈🎈सहकारी बांधवांनो ठाणे,रायगड,पालघर, नाशिक,मुंबई,रत्नागिरी ,पुणे,सिंधदुर्ग या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने जर शिक्षक बांधव👬👬👬👬 उपस्थित राहिल्यास आपणाला 1,00,000 आंदोलकांची संख्या गाठण्यास मदत होईल व आपल्या धरणे आंदोलनास व्यापक बळ मिळेल कारण या जिल्ह्यांना मुंबई जवळ आहे.

🚩🚩🚩आंतराचा विचार व सुट्याचा विचार न करता आठवा नागपूर अधिवेशनात महा.राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मुंबईचे जिल्हा अध्यक्ष

 श्री.तानाजी कांबळे सर

यांचा कंबरे पासूनचा खालचा भाग निकामी असताना दोन कुबड्यांच्या आधारे जिवण व्यतित करणारा

🙏🙏आमचा आदर्श शिलेदार जर मुंबई वरून नागपूरला येऊ शकतो तर आपण का जाऊ शकत नाही.खरच या शिलेदारास माझाचा मानाचा मुजरा 👏👏

मी तर जाणारच तुम्ही पण येणार यात शंकाच नाही तर चला मिञांना पण सोबत घेऊया जुन्या पेंशनच्या लढाईत एक पाऊल पुढे राहुया!!!!!!

👏👏 तरीही कोकण, पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा च्या भागातून मुंबई जवळ असल्याकारणाने  सर्व DCPS त्रस्त कर्मचाऱ्यांनी विराट संख्येने सहभागी होऊन या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला आपण सर्वजण मिळून जागे करू या.

    ⚡⚡ लक्षात ठेवा

✊लोकशाहीत धोरण बदलते....केवळ समूह शक्तिनेच .!!✊✊

15 मार्च च्या धरणे आंदोलनात  स्वतःच्या इच्छेने सामिल व्हा व आपल्या मित्रांना पण विनंती करा.
            समान न्यायाची मागणी हि रास्त आहे.


✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊

✊अभि नही तो कभी नही ✊

💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी  पुढाकार घ्या .

👉👉👉३१ ऑक्टोबर २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचारी यांना  जुनी पेंशन योजना लागु करा या मागणीसाठी

👆👆👉महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या
 15 मार्च 2016 च्या मुंबई येथील  आझाद मैदानावरील

    " धरणे "आंदोलनात

👬👬👬👬👬👬👬👬
सहभागी व्हा,ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
 

आपलाच DCPS त्रस्त शिक्षक

       📝परमेश्वर कामशेट्टे
            9423356752
             घनसावंगी
           जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.


कर्मचारी बांधवांनो SORRY DCPS त्रस्त बांधवांनो🙏🙏🙏नमस्कार 

15 मार्चच्या आझाद मैदान मुंबई येथील DCPS धारकांच्या धरणे आंदोलनाविषयी माझे मत

लेख थोडा मोठा आहे पण वेळ काढून🙏🙏 वाचा व विचार करा.

👏👏 सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो कि माझी ही पोस्ट आपल्या राज्यभर विस्तारलेल्या शिक्षक बांधवांसाठी  ज्ञानाचा डोस नाही किंवा उपदेशही नाही.
मी काही कुठल्याही संघटनेत नाही ,कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाही . 

👉👉🙏पण कुठेतरी विचार केला पाहिजे. 

👉👆👇🏾14 डिसेंबर च्या नागपूर येथिल आक्रोश मोर्चात साधारणतः 30000 ते 35000 DCPS त्रस्त बांधव मोठ्या आशेने 👬👬👬👬👬सहभागी झाले होते 

त्या सर्वांना माझा मनाचा मुजरा🙏🙏

⚡⚡⚡मित्रांनो 14 डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनवरच्या आक्रोश मोर्चाने इतिहास घडवला असे आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी खालील करणे आपण लक्षात घेतली पाहिजेत.

📢📢📢प्रत्येक जण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोर्चात स्वइच्छेने सहभागी झाले होते.

👊👊👊 संघटनेची पावती💵 फाडून 8 दिवस सुट्ट्या उपभोगण्याचा तेथे प्रश्नच नव्हता कारण सहभागी होणारा प्रत्येक बांधव भविष्याबाबत साशंक असल्यामुळे आक्रोश करत होता.

👆👉👇🏾आणि हा आक्रोश नागपूरची प्रत्येक जनता आपल्या डोळ्याचे ☺☺पारणे फेडणारा DCPS त्रस्तांचा आक्रोश मोर्चा मोबाईल,कॅमेरा असेल ती वस्तू यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होता. 

😌😌😌 नागपूरकरांसाठी हा काही पहिलाच मोर्चा होता असे नाही मित्रांनो त्यांनी असे 1960 पासून खूप मोठे मोर्चे,धरणे,आंदोलने पाहिलेले आहेत त्यांच्या डोळ्यात कॅमेऱ्यात कैद केलेले आहेत तरीपण सर्व नागपूरकर आवक होऊन तोंडात बोट घालून आपल्या आक्रोश मोर्चाची स्तुती करत होते मित्रांनो नेमके काय कारण असावे बरे कि नागपूरकर आपल्या मोर्चाला दाद देत होते.

📢📢सहकारी बांधवांनो नक्कीच आपला आक्रोश मोर्चा हा नागपूरच्या इतिहासामध्ये ना भूतो न भविष्य असा झाला हे आपण निर्विवादपणे मान्य केलेच पाहिजे.

  ⚡🍭⚡आता मी मोर्चाच्या यशाची शासन स्तरावरची बाजू सांगतो.⚡🍭⚡

 🎈🎈आक्रोश मोर्चा संपन्न झाला आणि काही दिवसांनी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले.

😰😰😰सरकारची आपल्या प्रश्नावरून अक्षरशः झोप उडाली .

👉👇🏾 सरकार अनैतिकपने कामाला लागले आणि DCPS बाबत सावध पवित्रा घेत प्रथम अनुदानित शाळातील कर्मचाऱयाच्या नवीन DCPS अकाउंट ओपन करण्याचा आदेश काढला व मग टप्प्याटप्प्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या DCPS कपतीचा नियमबाह्य

👆👉कोर्टाचा अवमान करणारा आदेशाचा वारू आपल्यामध्ये उधळून दिला 

👊येनकेन प्रकारे या विषयावर आपणामध्ये फूट पडून हा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न केला. परन्तु आपल्या उत्साही तसेच ACTIVE बांधव न्यायालयात सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करून हा कपातीचा वारू निश्चितपणे रोखणार यात शंका नाही.

🍭🍭🍭कारण या मुद्द्यावर सरकार गांगरून गेलंय हे खालील मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येईल.


📜📜26 फेब्रुवारी 2016 रोजी DCPS च्या कपाती करण्यासंदर्भात 

💻💻शालार्थ चा TAB OPEN करत असल्याबाबतचे पत्राचे सूक्ष्म व संदर्भाने वाचन केले असता असे लक्षात येते कि या 

👆👇🏾👉पत्रामध्ये न्यायालयाच्या आदेशाने कपात बंद होती असे म्हंटले पण या पत्रात याचिका क्रमांक देण्याचे मुद्दाम टाळले गेले परंतु त्याच पत्रामध्ये

👆👉दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्राचा संदर्भ दिला आहे संबंधीत
 दि.7 एप्रिल 2014 रोजीचे 
पत्र आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर असे लक्षात आले कि

👆👇🏾👉✊📢723/2014 क्रमांकाची WRIT याचिका मुंबई HIGH COURT

 मध्ये दाखल असून कोर्टानेच कपतीला स्थगिती दिली असल्याचे 7 एप्रिल 2014 च्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

🚩⚡🎈🍭
 मग प्रश्न पडतो कि या CASE चा निकाल लागलेला आहे का तर याचे उत्तर 

नाही         नाही         नाही 

असेच आहे कारण मित्रांनो आपण 

MUMBAI HIGH COURT च्या WEBSITE वर 723/2014 क्रमांकाच्या WRIT याचिकेची माहिती घेतली असता

 17 फेब्रुवारी2016 रोजी कोर्टाने मागचा दिलेला कपातीचा स्टे कायम असल्याचे म्हंटले आहे मग सरकारने DCPS च्या कपातीचा घाट का घातला आहे?? असा प्रश्न पडतो.


  💢1)  सहकारी बांधवांनो सरकार आपले प्रकरण दडपण्याचा 👎 प्रयत्न करत आहे असे आपणास वाटत नाही काय?

💢2) सरकारने जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वाढत्या प्रसिद्धी व प्रसाराचा धसका तर घेतला नाही ना? 

💢3)   DCPS च्या कपातीचे काढलेले पत्र हे घाईघाईत तर काढलेले नाही ना?

📢📢मित्रांनो DCPS चे हे पत्र म्हणजे सरकारचे DCPS च्या नियमबाह्य कपातीचे षडयंत्र आहे 
हे पत्र न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

🇮🇳🇮🇳🇮🇳  सैनिक हे सीमेवर राहून देशाचे संरक्षण करतात तर शिक्षक हे देशात राहून देश , समाज घडवतात. माजी सैनिकांनी गेल्या 50 वर्षांपासूनची

  👍ONE RANK ONE PENSION 👍

 ही मागणी मान्य करून घेतली. 

👬👬👬👬२००५ नंतर लागलेले काही मित्र आज आमच्यात नाही आहे...ना त्यांना पेंशन आहे न अनुकंपा.त्यांचे कुटूंब आज उघड्यावर आहेत. शासनाने  अशा किती कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे का? साधी विचारपुस सुद्धा केली नाही.


👬👬💪आता थोडेसे 15 मार्चच्या धरणे आंदोलनाबद्दल बोलूया.👬👬💪


 👉TO BE OR NOT TO BE.
👉करावे कि करू नये.👈

⚡ मुंबईला जावे कि जाऊ नये.⚡

🍭🍭हा प्रश्न नागपूरला आलेल्या तसेच न आलेल्या सर्व कर्मचारी बांधवांच्या मनात घोळवत आहे कारण जे नागपूरला आले होते त्यांना असे वाटतेय कि आम्ही नागपूरला गेलो होतो म्हणून जे  आक्रोश मोर्चाला आले नव्हते त्यांनी मुंबईला धरणे आंदोलनात सहभागी व्हावे .

👏👏परन्तु मला असे वाटतेय कि मित्रांनो आपण सर्वजण मुंबईच्या 15 मार्चच्या धरणे आंदोलनाला जाऊ व शासनाला छाती ठोकून सांगू कि तुम्ही कितीही DCPS कपातीचे नियमबाह्य पत्र काढा आम्ही त्याला भीक घालणार नाही.  व सर्व कर्मचारी एकत्र येऊन जुनी पेन्शनची ✌✌मागणी मान्य करूनच घेऊ.

🍭🍭आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या माझ्या कर्मचारी बांधवांनो आपण DCPS बाबत सरकारला डिवचले आहे त्यामुळे ज्याप्रकारे 🐍🐍🐍सापाला डिवचून सोडून द्यायचे नसते त्या प्रमाणेच सरकारला पण सोडायचे नसते .
आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांनो आपली लढाई हि अशी अर्ध्यावर सोडू नका व सर्वजण मुंबईला चला.

💪💪👊✊आता आपण सर्वजण जर मोर्चात सामील झालो तर आपल्या पाठीशी सर्वात वयस्कर शेकापचे आमदार भाई गणपतराव देशमुख ,आ.धैर्यशील पाटील,आ.लाड यांच्यासह सह अनेक आमदारांचा आपल्याला पाठिंबा मिळाला आहे. आणि जो पर्यंत आपल्या विषयाचे राजकारण होणार नाही तो पर्यंत आपला प्रश्न सुटणार नाही आणि त्यामुळे DCPS बाबत राजकारण झालेच पाहिजे.

🙏👏माझी सर्वांना नम्रतेची 🙏👏विनंती आहे कि सर्वांनी 15 मार्चच्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन सरकारला आम्ही सर्व एकत्रच आहोत व आमची DCPS ची कपात करणार नसून 
आम्हा सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना

 📋1982 ची जुनीच पेन्शन

 देण्यात यावी असे ठासून सांगूया.


🍭🍭🍭मी एकटा नागपूरला  नाही गेल्यास काही फरक पडणार नाही. असा विचार कूणीही करू नये.आपण लढ्यासाठी प्रत्येकजण अनमोल आहात.


चलो मुंबई 🏃चलो मुंबई 🏃चलो मुंबई

👉✊👊15 मार्च 2016 ला आजाद मैदान ,मुंबई येथे

"महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन"

 च्या धरणे आंदोलनात 31 ऑक्टोबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन सरकारवर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दबाव आणूया.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

  
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक 

        कामशेट्टे परमेश्वर
          9423356752
          प्रा.शा.भादली
          ता.घनसावंगी 
          जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी. 
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

शिक्षक बांधवांनो आपली DCPS कपात का बंद होती???????????
      📌📌वाचा📌📌
           कामशेट्टे परमेश्वर
        घनसावंगी जी जालना
            9423356752

👇🏾👇🏾
26 फेब्रुवारी 2016 रोजी DCPS च्या कपाती करण्यासंदर्भात शालार्थ चा TAB OPEN करत असल्याबाबतचे पत्राचे सूक्ष्म व संदर्भाने वाचन केले असता असे लक्षात आले कि

📌📌मित्रांनो आपल्या DCPS च्या कपती ह्या पुढील पत्राने स्थगित झाली होती.

👇🏾👇🏾👇🏾
क्र. शिसमा/आस्था-ब/121/शालार्थ/2014/3893,
दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्र
👆👆👆

या पत्राने आपल्या DCPS च्या कपाती एप्रिल 2014 पासून बंद झाल्या होत्या.

👉त्या पत्राचा खुलासा करण्यासाठी या योजनेला मुंबई HIGH COURT मध्ये केवळ याचिका दाखल करण्यात आल्यामुळे शिक्षक संचालनाने पत्र काढून तात्पुरती कपात थांबविण्यात आले होते असे स्पष्ट केले आहे.

त्यावर माझे काही प्रश्न

 👉1)कोर्टातील त्या याचिकेचा निकाल लागलाय का?

२) जर कोर्टातील त्या याचिकेचा निकाल लागला नसेल तर DCPS  च्या कपातीसाठी एवढी घाई का?

3)जर निकाल लागला असेल तर काय लागला व कोर्टाचे म्हणणे काय आहे?

4)इतके दिवस कपात बंद ठेऊन सरकारने काय सध्या केले?

5) एकवेळ असे मान्य केले कि DCPS हि योजना चांगली आहे तर मग या कपती 8 वर्ष बंद राहील्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण?

👇🏾👇🏾👇🏾निष्कर्ष👇🏾👇🏾👇🏾

कपती बंद राहिल्यामुळे आमचे नुकसान झाले कारणाने आम्हाला जुनी पेन्शनच लागू झाली पाहिजे हे आपण वकीलामार्फत कोर्टात सांगू शकतो व आपली मागणी पूर्ण करू शकतो.

        💢माझेमत💢

यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून संबंधीत
📌 HIGH COURT 📌
मध्ये DCPS कपती विरोधात आता STAY आणणे गरजेचे आहे.

दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्र
 जर आपल्याला उपलब्ध झाले तर तो कोर्टामध्ये DCPS च्या तसेच सरकारच्या विरोधात त्यांनी केलेल्या अन्यायाबाबत महत्वाचा पुरावा होऊ शकतो असे मला वाटते.

DCPS कपाती बाबत कोर्टाचा STAY म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्यासारखे आहे.

   📌📌नम्र विनंती📌📌

 दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्र

👆👆👉👊जर कोणाकडे उपलब्ध असेल तर WHATS UP वर सादर करून जे बांधव कोर्टात याचिका दाखल करत आहेत त्यांना मदत करावी.

  📌अत्यंत महत्वाचे📌

जे शिक्षक बांधव मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनी DCPS बाबतच्या ज्या याचिकेमुळे आपला STAY आलेला होता ती याचिका कोणी दाखल केली होती त्याचा
शोध घेऊन निर्णय  लागला आहे कि नाही हे पाहणे गरजेचे आहे.

✊जर लागला असेल तर कोर्टाने काय निकाल दिलाय तो अभ्यासणे गरजेचे आहे.

संबंधित याचिका हि कोणत्या वकीलामार्फत दाखल केली होती? हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे.

👉या सर्व बाबी आपणाला जुनी पेन्शन मिळवून देण्यास मदत करणार आहेत.

आजही आमच्या बऱ्याच कर्मचारी बांधवांना माझ्यासह हे माहित नव्हते कि DCPS कपात का बंद होती.

👉 खरोखरच तो STAY आपलाच होता कि 1 नोव्हेंबर 2005 च्या कर्मचाऱ्यांचा होता हेच आम्हाला माहित नव्हते.

📌 असो काही का कारण असेना DCPS च्या कपती बंद होत्या हे आपणाला

      👊जुनी पेन्शन👊

 मिळवून देण्यासाठीच सरकारने केलेली चूक आहे असे आपणाला म्हणता येईल.

चलो मुंबई 🏃चलो मुंबई 🏃चलो मुंबई

👉✊👊15 मार्चला आजाद मैदान ,मुंबई येथे
"महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन"

 ने ठेवलेल्या मुंबई येथील धरणे आंदोलनात सर्वांनी सहभागी होऊन व सरकारवर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दबाव आणूया व कोर्टात पण लढूया.
आपला हक्क मिळवण्यासाठी सज्ज व्हा.

🙏🙏एक नम्र विनंती🙏🙏

हा संदेश राज्याच्या सर्व कर्मचार्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे कारण त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल कि जुनी पेन्शन आम्हाला नक्कीच मिळेल.
कारण कोर्टामध्ये आपली बाजू हि भक्कम आहे.

आपल्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय.
हा विचार पुढे पाठवा.

   जुनी पेन्शनचा एक शिलेदार
         📝 कामशेट्टे परमेश्वर
        घनसावंगी जि.जालना
             9423356752