DCPS धारकांनो वेळ काढून वाचाच. थोडा तरी विचार करा.
DCPS DCPS DCPS
👉👉2014 मध्ये निवडणूक होत असताना सर्व कर्मचारी , शेतकरी तसेच जनता यांना एक आशेचा किरण दिसला व नवीन येणारे सरकार हे मोठ्या फरकाने सत्तेवर आरूढ झाले .
😜😜😜😜सर्व जनता ,कर्मचारी ,शेतकरी हे या सरकार कडे डोळे लावून चांगल्या निर्णयाची वाट पाहत असतानाच दररोज एक नवीन तुघलकी निर्णय काढत आहे व दोनच दिवसात त्यावर टीका झाल्यास तो मागे घेत आहे.
👉👉मग तो 8 तास शाळा सुरु ठेवण्याचा असो कि सहलीवर निर्बंध घालण्याचा असो कि चारा छावण्या ऑगस्ट ते जानेवारी पर्यंत चालू ठेऊन अचानक सरकारला मे पर्यंत पाणी पुरेल असे वाटण्याचा साक्षात्कार होऊन छावण्या बंद करण्याचा असो ह्या सरकारच्या तुघलकी निर्णयाने जनता त्रस्त झाली आहे.
💢💢👉👉👉स्व. नकाशे सर सारख्या प्रामाणिक मुख्याध्यापकावर ची कारवाई झाली व त्यांनी आपले जीवन संपवले.
💢💢👉👉👉कर्मचारी बांधवांनो आपल्याला पेन्शन न देता व DCPS सारखी तुघलकी योजना मागच्या सरकारने आपल्यावर लादली.
💢👎👎👎👎ह्या योजनेची कशाप्रकारे अंमलबजावणी करावी हे मागच्या सरकारला पण शेवट पर्यंत समजले नव्हते.
😫😫😫😫 जुन्या सरकारने DCPS सारखी जाचक योजना सुरु करून पाप केले आहे आणि हे पाप या सरकारने आपल्या पदरात घेण्याचे पक्के ठरवले आहे असेच वाटते.
👎👎 परंतु हे सरकार हे पाप पदरात घेत असताना आमच्या सरकारने खूप मोठी कामगिरी करत असल्याचा अविर्भाव जर आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांच्यासाठीच धोक्याची घंटा ठरेल.
👉👉👉👉काल ,आज व येत्या दोन तीन दिवसात सर्व DCPS धारक कर्मचारी यांचे ACCOUNT NU. तात्काळ माहिती तालुका स्तरावर मागण्यात आले आहेत.
💢👎👎 DCPS चे तोटे माहिती असून सुद्धा आपले कर्मचारी त्याला विरोध करताना दिसत नाहीत व साधी चर्चाही करीत नाहीत.
🙏🙏🙏 सहकारी मित्रानो जर का एकदा ह्या कपाती सुरु झाल्या तर आपल्याला आपला हिशोब तर मिळणारच व एक तुघलकी योजनेचं भूत आयुष्यभर आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही, यात आपला पाय खोलात रुतेल व नंतर
FEEL
होऊन त्याचा काही👎👎 उपयोग होणार नाही.
कारण याला विरोध एकत्रितपणे तीव्र म्हणजेच तन ,मन ,व धनाने करण्याची गरज आहे.
👉👉 मित्रानो संधी हि एकदाच मिळते. ती आपल्याला मिळालीय , त्याच रूपांतर हे आपण सर्वजण एकत्रित येऊन ह्या भुताला सर्वांनी मिळून उचलून आपटायचय.
🙏🙏🙏मी काही तुम्हाला ज्ञानाचे डोस पाजवण्याइतका ज्ञानी नाही. तुम्ही सर्व सुज्ञ आहेत . पण सर्वजण एकत्र येऊन ह्या कपातिला विरोध करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
👉✊✊✊जर आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला तर सरकार ज्या प्रमाणे आज घेतलेला निर्णय तिसऱ्या दिवशी विरोधक व जनता यांच्या दबावामुळे रद्द करतेय त्याच प्रमाणे आपल्या कपात बंदीचा निर्णय घेईल व जुन्या पेन्शन बाबत गांभीर्याने विचार करेल.
💪💪 करा विचार आणि आजच संकल्प करा कि आम्ही आमची DCPS ची कपात करणार नाही.
💪💪जुन्या पेन्शन हक्क संघटनेला शासनावर दबाव आणण्यासाठी बाळ द्या.
✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊
✊अभि नही तो कभी नही ✊
💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी पुढाकार घ्या .
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक
परमेश्वर कामशेट्टे
9423356752
प्रा.शा.भादली
जि. जालना💐💐
कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.
चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

No comments:
Post a Comment