शिक्षकांची कपात का बंद होती

Saturday, 12 March 2016



कर्मचारी बांधवांनो SORRY DCPS त्रस्त बांधवांनो🙏🙏🙏नमस्कार 

15 मार्चच्या आझाद मैदान मुंबई येथील DCPS धारकांच्या धरणे आंदोलनाविषयी माझे मत

लेख थोडा मोठा आहे पण वेळ काढून🙏🙏 वाचा व विचार करा.

👏👏 सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो कि माझी ही पोस्ट आपल्या राज्यभर विस्तारलेल्या शिक्षक बांधवांसाठी  ज्ञानाचा डोस नाही किंवा उपदेशही नाही.
मी काही कुठल्याही संघटनेत नाही ,कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाही . 

👉👉🙏पण कुठेतरी विचार केला पाहिजे. 

👉👆👇🏾14 डिसेंबर च्या नागपूर येथिल आक्रोश मोर्चात साधारणतः 30000 ते 35000 DCPS त्रस्त बांधव मोठ्या आशेने 👬👬👬👬👬सहभागी झाले होते 

त्या सर्वांना माझा मनाचा मुजरा🙏🙏

⚡⚡⚡मित्रांनो 14 डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनवरच्या आक्रोश मोर्चाने इतिहास घडवला असे आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी खालील करणे आपण लक्षात घेतली पाहिजेत.

📢📢📢प्रत्येक जण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोर्चात स्वइच्छेने सहभागी झाले होते.

👊👊👊 संघटनेची पावती💵 फाडून 8 दिवस सुट्ट्या उपभोगण्याचा तेथे प्रश्नच नव्हता कारण सहभागी होणारा प्रत्येक बांधव भविष्याबाबत साशंक असल्यामुळे आक्रोश करत होता.

👆👉👇🏾आणि हा आक्रोश नागपूरची प्रत्येक जनता आपल्या डोळ्याचे ☺☺पारणे फेडणारा DCPS त्रस्तांचा आक्रोश मोर्चा मोबाईल,कॅमेरा असेल ती वस्तू यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होता. 

😌😌😌 नागपूरकरांसाठी हा काही पहिलाच मोर्चा होता असे नाही मित्रांनो त्यांनी असे 1960 पासून खूप मोठे मोर्चे,धरणे,आंदोलने पाहिलेले आहेत त्यांच्या डोळ्यात कॅमेऱ्यात कैद केलेले आहेत तरीपण सर्व नागपूरकर आवक होऊन तोंडात बोट घालून आपल्या आक्रोश मोर्चाची स्तुती करत होते मित्रांनो नेमके काय कारण असावे बरे कि नागपूरकर आपल्या मोर्चाला दाद देत होते.

📢📢सहकारी बांधवांनो नक्कीच आपला आक्रोश मोर्चा हा नागपूरच्या इतिहासामध्ये ना भूतो न भविष्य असा झाला हे आपण निर्विवादपणे मान्य केलेच पाहिजे.

  ⚡🍭⚡आता मी मोर्चाच्या यशाची शासन स्तरावरची बाजू सांगतो.⚡🍭⚡

 🎈🎈आक्रोश मोर्चा संपन्न झाला आणि काही दिवसांनी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले.

😰😰😰सरकारची आपल्या प्रश्नावरून अक्षरशः झोप उडाली .

👉👇🏾 सरकार अनैतिकपने कामाला लागले आणि DCPS बाबत सावध पवित्रा घेत प्रथम अनुदानित शाळातील कर्मचाऱयाच्या नवीन DCPS अकाउंट ओपन करण्याचा आदेश काढला व मग टप्प्याटप्प्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या DCPS कपतीचा नियमबाह्य

👆👉कोर्टाचा अवमान करणारा आदेशाचा वारू आपल्यामध्ये उधळून दिला 

👊येनकेन प्रकारे या विषयावर आपणामध्ये फूट पडून हा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न केला. परन्तु आपल्या उत्साही तसेच ACTIVE बांधव न्यायालयात सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करून हा कपातीचा वारू निश्चितपणे रोखणार यात शंका नाही.

🍭🍭🍭कारण या मुद्द्यावर सरकार गांगरून गेलंय हे खालील मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येईल.


📜📜26 फेब्रुवारी 2016 रोजी DCPS च्या कपाती करण्यासंदर्भात 

💻💻शालार्थ चा TAB OPEN करत असल्याबाबतचे पत्राचे सूक्ष्म व संदर्भाने वाचन केले असता असे लक्षात येते कि या 

👆👇🏾👉पत्रामध्ये न्यायालयाच्या आदेशाने कपात बंद होती असे म्हंटले पण या पत्रात याचिका क्रमांक देण्याचे मुद्दाम टाळले गेले परंतु त्याच पत्रामध्ये

👆👉दि.7 एप्रिल 2014 रोजीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयाचे पत्राचा संदर्भ दिला आहे संबंधीत
 दि.7 एप्रिल 2014 रोजीचे 
पत्र आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर असे लक्षात आले कि

👆👇🏾👉✊📢723/2014 क्रमांकाची WRIT याचिका मुंबई HIGH COURT

 मध्ये दाखल असून कोर्टानेच कपतीला स्थगिती दिली असल्याचे 7 एप्रिल 2014 च्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

🚩⚡🎈🍭
 मग प्रश्न पडतो कि या CASE चा निकाल लागलेला आहे का तर याचे उत्तर 

नाही         नाही         नाही 

असेच आहे कारण मित्रांनो आपण 

MUMBAI HIGH COURT च्या WEBSITE वर 723/2014 क्रमांकाच्या WRIT याचिकेची माहिती घेतली असता

 17 फेब्रुवारी2016 रोजी कोर्टाने मागचा दिलेला कपातीचा स्टे कायम असल्याचे म्हंटले आहे मग सरकारने DCPS च्या कपातीचा घाट का घातला आहे?? असा प्रश्न पडतो.


  💢1)  सहकारी बांधवांनो सरकार आपले प्रकरण दडपण्याचा 👎 प्रयत्न करत आहे असे आपणास वाटत नाही काय?

💢2) सरकारने जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वाढत्या प्रसिद्धी व प्रसाराचा धसका तर घेतला नाही ना? 

💢3)   DCPS च्या कपातीचे काढलेले पत्र हे घाईघाईत तर काढलेले नाही ना?

📢📢मित्रांनो DCPS चे हे पत्र म्हणजे सरकारचे DCPS च्या नियमबाह्य कपातीचे षडयंत्र आहे 
हे पत्र न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

🇮🇳🇮🇳🇮🇳  सैनिक हे सीमेवर राहून देशाचे संरक्षण करतात तर शिक्षक हे देशात राहून देश , समाज घडवतात. माजी सैनिकांनी गेल्या 50 वर्षांपासूनची

  👍ONE RANK ONE PENSION 👍

 ही मागणी मान्य करून घेतली. 

👬👬👬👬२००५ नंतर लागलेले काही मित्र आज आमच्यात नाही आहे...ना त्यांना पेंशन आहे न अनुकंपा.त्यांचे कुटूंब आज उघड्यावर आहेत. शासनाने  अशा किती कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे का? साधी विचारपुस सुद्धा केली नाही.


👬👬💪आता थोडेसे 15 मार्चच्या धरणे आंदोलनाबद्दल बोलूया.👬👬💪


 👉TO BE OR NOT TO BE.
👉करावे कि करू नये.👈

⚡ मुंबईला जावे कि जाऊ नये.⚡

🍭🍭हा प्रश्न नागपूरला आलेल्या तसेच न आलेल्या सर्व कर्मचारी बांधवांच्या मनात घोळवत आहे कारण जे नागपूरला आले होते त्यांना असे वाटतेय कि आम्ही नागपूरला गेलो होतो म्हणून जे  आक्रोश मोर्चाला आले नव्हते त्यांनी मुंबईला धरणे आंदोलनात सहभागी व्हावे .

👏👏परन्तु मला असे वाटतेय कि मित्रांनो आपण सर्वजण मुंबईच्या 15 मार्चच्या धरणे आंदोलनाला जाऊ व शासनाला छाती ठोकून सांगू कि तुम्ही कितीही DCPS कपातीचे नियमबाह्य पत्र काढा आम्ही त्याला भीक घालणार नाही.  व सर्व कर्मचारी एकत्र येऊन जुनी पेन्शनची ✌✌मागणी मान्य करूनच घेऊ.

🍭🍭आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या माझ्या कर्मचारी बांधवांनो आपण DCPS बाबत सरकारला डिवचले आहे त्यामुळे ज्याप्रकारे 🐍🐍🐍सापाला डिवचून सोडून द्यायचे नसते त्या प्रमाणेच सरकारला पण सोडायचे नसते .
आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांनो आपली लढाई हि अशी अर्ध्यावर सोडू नका व सर्वजण मुंबईला चला.

💪💪👊✊आता आपण सर्वजण जर मोर्चात सामील झालो तर आपल्या पाठीशी सर्वात वयस्कर शेकापचे आमदार भाई गणपतराव देशमुख ,आ.धैर्यशील पाटील,आ.लाड यांच्यासह सह अनेक आमदारांचा आपल्याला पाठिंबा मिळाला आहे. आणि जो पर्यंत आपल्या विषयाचे राजकारण होणार नाही तो पर्यंत आपला प्रश्न सुटणार नाही आणि त्यामुळे DCPS बाबत राजकारण झालेच पाहिजे.

🙏👏माझी सर्वांना नम्रतेची 🙏👏विनंती आहे कि सर्वांनी 15 मार्चच्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन सरकारला आम्ही सर्व एकत्रच आहोत व आमची DCPS ची कपात करणार नसून 
आम्हा सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना

 📋1982 ची जुनीच पेन्शन

 देण्यात यावी असे ठासून सांगूया.


🍭🍭🍭मी एकटा नागपूरला  नाही गेल्यास काही फरक पडणार नाही. असा विचार कूणीही करू नये.आपण लढ्यासाठी प्रत्येकजण अनमोल आहात.


चलो मुंबई 🏃चलो मुंबई 🏃चलो मुंबई

👉✊👊15 मार्च 2016 ला आजाद मैदान ,मुंबई येथे

"महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन"

 च्या धरणे आंदोलनात 31 ऑक्टोबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन सरकारवर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दबाव आणूया.

✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊

✊✊एकच मिशन जुनी पेन्शन ✌✌

  
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक 

        कामशेट्टे परमेश्वर
          9423356752
          प्रा.शा.भादली
          ता.घनसावंगी 
          जि.  जालना💐💐

कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी. 
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

No comments:

Post a Comment