शिक्षकांची कपात का बंद होती

Thursday, 17 March 2016


DCPS धारकांनो सावधान पुढे धोका आहे.
वाचा  विचार करा आणि ठरवा

DCPS धारकांनो येत्या काही दिवसात राज्यातील संघटनांच्या अधिवेशनांचे पीक जोरात आले आहे व येईल.

संघटनेच्या अधिवेशनात
👉जुनी पेन्शन च्या मागणीचा
 मुद्दा क्रमांक 1 ☝ला घेण्यात येत असल्याचे  
👉तसेच महाराष्ट्र शासनाकडून 8 दिवसाच्या विशेष रजा मंजुर करण्यात आल्याचे सांगण्यात येईल व

👉अधिवेशनाच्या पावत्या फाडा आणि सुट्ट्यांच्या आनंद घ्या असे मोठेपणाने सांगतील.

🙏🙏🙏 परन्तु लक्षात घ्या बांधवांनो काल परवाच कुठल्यातरी नामांकित संघटनेचे अधिवेशन झाले आपल्याला सांगण्यात आले कि आता या अधिवेशनातील प्रमुख मागण्यामध्ये जुनी पेन्शन चा मुद्दा हा आम्ही

 क्रमांक 1☝ ला घेतलाय व आमचीच संघटना हा प्रश्न सोडवेल व या अधिवेशनात नक्कीच हा मुद्दा मंजूर करून घेऊ असे आपल्याला सांगितले गेले.

😒😒मग आपल्या DCPS धारक बांधवानी विचार केला व चर्चा सुरु केली पहा सर आपल्या नागपूर मोर्चामुळे जुनी पेन्शन च्या मागणीचा

 मुद्दा 1 ☝नंबर वर मोठ्या संघटनेने घेतलाय व आता काळजीचे कारण नाही चला तर मग आपण 500 रुपयांची पावती घेऊन सुट्ट्यांच्या आनंद घेऊ व आपली मागणी संघटना मान्य करून घेईलचकी आपण तेथे जाण्याची आवश्यकताच नाही.

👉अधिवेशनात मागण्या मांडण्यात आल्या त्यावर काय चर्चा झाली कुणालाच काही माहित नाही .कोणत्या मंजूर झाल्या काहीच माहित नाही.

☝अधिवेशन पार पडले आमचे बांधव सुट्टीचा आनंद उपभोगून आले .

👉 अधिवेशन संपन्न झाल्यानंतर
       सहाच दिवसात शासनाने अधिवेशनाचे गिफ्ट 💼💼दिले DCPS च्या दुहेरी कपातीचे शासनाने पत्र काढले.

सर्वच संघटनाचे पदाधिकारी थंडगार राहिले व आपल्या DCPS धारकांकडे अनुल्लेखाने व वेगळ्या नजरेने पाहत मनात म्हणू लागले कि मोर्चा काढता का आमच्या पेक्षा मोठी संघटना तयार करता का ?
कशी जिरली तुमची. आता काढा मोर्चे.

☝मग 11 तारखेपासून आपली तारांबळ उडायला लागली.जो तो आपल्या मित्रांना फोन करून
👉 DCPS कपातीचे पत्र खरे कि खोटे याची खात्री करून घेऊ लागला व म्हणू लागला कि आता जुनी पेन्शन ची आशा मवाळली.

😷😷परन्तु यावर कोणत्याही नावाजलेल्या  संघटनेने कुठलेही comment केली नाही फक्त बघ्याची भूमिका घेतली.

👉  आमची सर्वात मोठी संघटना आहे असे म्हणायचे व वेळ आल्यास दबा धरून बसायचा हा कोणता दुटप्पीपणा आहे.

✅✅✅
अधिवेशनाच्या पावत्या ह्या सर्वात जास्त Nov 2005 च्या शिक्षकांकडूनच फाडल्या जातात.

💵💵💵💵 साधारणपणे एका अधिवेशनात 60000 पावत्या फाडल्या
तर
  60000 × 500 रु =        
    30000000 रुपये इतक्या रकमेचे काय होते ते कुणालाच माहित नसते.

🙏🙏 मित्रांनो मला सर्वच संघटनांना दोष द्यायचा नाही काही संघटना ह्या सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या जाणिवेतून काम करतातच.

🙏🙏🙏विचार करा आपला प्रश्न आपणच सोडवण्यासाठी सिद्ध व्हा. दुसर्यांकडून अपेक्षा करू नका .

🙏मी काही खूप मोठा विचारवंत नाही कि तुम्हाला विचारांचा डोस पाजायला पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे.

   जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर 🙏🙏माफी असावी माझा तसा कुठलाही हेतू नाही.


       आपलाच DCPS
          त्रस्त सहकारी
         कामशेट्टे परमेश्वर
                जालना
           9423356752
💐💐
कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.

चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

No comments:

Post a Comment