👉कृपया POST कडे दुर्लक्ष करण्यापूर्वी वाचा आणि निर्णय घ्या.
DCPS धारक कर्मचारी बांधवांनो
🙏🙏🙏नमस्कार
मी काही संघटनेत नाही ,कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाही .
🙏माझी ही पोस्ट आपल्या राज्यभर विस्तारलेल्या शिक्षक बांधवांसाठी ज्ञानाचा डोस नाही किंवा उपदेशही नाही.
पण कुठेतरी विचार केला पाहिजे.
💢 1) दोनच दिवसा पूर्वी DCPS कपातीचे पत्र सर्व जिल्हापरिषदेला प्राप्त झाले आहे.
💢 2) मित्रांनो आपण सर्व कर्मचाऱ्यांनी DCPS ला विरोध व जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या आक्रोश मोर्चात 35 हजार कर्मचारी सहभागी झाले होते.
💢 3) DCPS त्रस्त सर्व कर्मचारी या मोर्चात काही कारणास्तव
प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नसले तरी अप्रत्यक्ष म्हणजेच मनाने व धनाने सहभागी झाले होतेच कारण DCPS सारखी अन्याय करणारी योजना कोणालाही लागू होऊ नये असेच वाटते.
💢4) पण शासनाने आपल्यावर अन्याय करण्याचे ठरवले आहे.
💢5) त्याचाच भाग म्हणून DCPS कपातीचे पत्र व त्या पत्राची अंमलबजावणी कर०यासाठीचे शेडयुल सर्व EO ना आले आहे .
💢 6) पुन्हा एकदा नागपुर प्रमाणे धडक मोर्चा राज्यातील सर्व जिल्हा परिषद वर नेण्याची वेळ आली आहे .
💢 7) मित्रांनो राज्य स्तरावरून एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन झाले पाहिजे.
💢 8)मित्रांनो DCPS ला विरोध करण्याची व जुनी पेन्शन ची मागणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. यापुढील मोर्चात सर्वांनी तनाने ,मनाने व धनाने सहभागी होणे गरजेचे आहे.
💢9)2००5 नंतर लागलेले काही मित्र आज आमच्यात नाही आहे...ना त्यांना पेंशन आहे न अनुकंपा.त्यांचे कुटूंब आज उघड्यावर आहेत. शासनाने अशा किती कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे का? साधी विचारपुस सुद्धा केली नाही.
💢 10) मी व माझ्या शिक्षक मित्रांनी विविध सहकारी बँकेचे, SBI, SBH, पतसंस्थेचे किमान 500000 लाख रुपये चे कर्ज उचललेले आहे. या कर्जापोटी द्यावा लागणारा 5 वर्षापर्यंतवर्षापर्यंतचा किमान 8500रू चा मासिक हप्ता भरावा लागेल.
💢11) बर DCPS चे 2 हफ्ते आपली आत्तापर्यंत जितकी वर्षे सेवा झाली असेल म्हणजे किमान 5 वर्षे कपात होतील. निवृत्तीनंतर मिळणार किती याबद्दल आपण सर्वजण साशंक आहोत.
💢12) DCPS कपात व आपण घेतलेले कर्ज बाबींचा विचार केल्यास आपल्या हातात नगदी किती मासिक वेतन पडेल याचा प्रत्यक्ष तुम्हीच हिशेब करा.
(आपण सर्वजण 3 वर्षांनंतर मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाचा हिशेब करतोच की ? )
💢 13) इतर संघटना वार्षिक अधिवेशाच्या नावाखाली
केवळ आपली झोळी भरण्याचे काम करत आहेत.
💢14) 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी च्या अधिवेशनच्या पावत्या 2005 नंतरच्या शिक्षकांकडूनच जास्त फाडण्यात आल्या त्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो कि या अधिवेशनाचे हेच फलित आहे काय ?
💢15) आपला हक्क आपणच मिळवला पाहिजे इतर संघटनांवर अवलंबून न राहता सरकारशी दोन हात केले पाहिजे.
💢16) मित्रांनो वेळ गेली नाही विचार करा, इतरांना मोर्चात सहभागी होण्यासाठी विनंती करा, DCPS चे तोटे समजून सांगा व मोर्चाचे नियोजन करून एकाच वेळी शासनावर दबाव अणूयात व जुनी पेन्शचा आपला हक्क मिळूयात.
💢 17) मी एकटा मोर्चात नाही गेल्यास काही फरक पडणार नाही. असा विचार कूणीही करू नये.आपण लढ्यासाठी प्रत्येकजण अनमोल आहात.
💢18) यापुढच्या मोर्चात महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी मोर्चात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा व मोर्चातील संख्या वाढून सरकारवर दबाव पडेल.
💢19) DCPS कपातीचे फॉर्म भरून न देता आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे.
✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊
✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊
✊अभि नही तो कभी नही ✊
💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी पुढाकार घ्या .
३१ ऑक्टोबर २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या जिल्हास्तरावरच्या
"ANTI DCPS "
च्या मोर्चात सहभागी व्हा,ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक
परमेश्वर कामशेट्टे
9423356752
प्रा.शा.भादली
जि. जालना💐💐
कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.
चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

No comments:
Post a Comment